प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana)

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana)



"नमस्कार मंडळी,शेती ही आपल्या अर्थव्यवस्थेची मुख्य आधारस्तंभ आहे आणि शेतकरी बांधव हे आपले अन्नदाता आहेत. कारण या योजनांमुळे शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष फायदा होईल. आज आपण अशाच एका योजनेची माहिती पाहणार आहोत, जिच्या अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये आपण दैनंदिन जीवनात जे काही सुख अनुभवतो ते शेतकरी बांधवांच्या परिश्रमामुळेच आहे. म्हणूनच आपलं सरकार शेतकरी बांधवांसाठी विविध योजना आणत असतं. या योजनेला प्रधानमंत्री किसान योजना किंवा PM Kisan Yojana असे म्हणतात.


•प्रधानमंत्री किसान योजना वैशिष्ट्ये- 

  1. ही योजना पूर्णपणे भारत सरकारद्वारे चालवली जाते आणि 1 डिसेंबर 2018 पासून सुरू आहे. 
  2. या योजनेअंतर्गत सर्व जमिनधारक शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ₹6,000 तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात.

  3. या योजनेचा निधीचे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतो. 

  4. या योजनेसाठी पात्रता निश्चित करण्याची जबाबदारी राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनाकडे आहे.


प्रधानमंत्री किसान योजना पात्रता – 

  1. ज्या संस्थांच्या नावावर जमीन आहे, त्या पात्र ठरत नाहीत.
  2. संविधानिक पदावर असलेल्या माजी किंवा विद्यमान पदाधिकारी म्हणजे राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान सरन्यायाधीश इत्यादी जा योजनेसाठी अपात्र ठरतात. 
  3. सर्व प्रकारचे सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी अपात्र ठरतात.फक्त चतुर्थश्रेणी किंवा सहाय्यक कर्मचारीच या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  4. ह्या योजनेमध्ये समाजातील माजी किंवा वर्तमान खासदार, आमदार, मंत्री, राज्यमंत्री, महापौर किंवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष इत्यादी अपात्र ठरतात.
  5. सेवानिवृत्त व्यक्ती ज्यांचे मासिक पेन्शन ₹१०,००० किंवा त्यापेक्षा जास्त आहे, ते या योजनेसाठी अपात्र ठरतात. या योजनेसाठी फक्त चतुर्थ श्रेणी किंवा सहाय्यक कर्मचारी अर्ज करू शकतात.
  6. डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, अभियंता आणि वास्तुविशारद व्यावसायिक अपात्र ठरतात. नंतरीतील सर्व करदात्यांनी ज्यांनी मागील वर्षात कर भरला आहे त्यांसाठी या योजनेसाठी अपात्र ठरतात.


प्रधानमंत्री किसान योजना कागदपत्र-

  •  बँक पासबुक. 
  • आधार कार्ड 
  • ७/१२ किंवा जागेचा उतारा.
  • मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडले गेलेला असला पाहिजे.
  • आधार नंबर बँक अकाउंटशी जोडलेला असला पाहिजे.


• प्रधानमंत्री किसान योजना नाव नोंदणी


नियमांसह सांगितलेल्या प्रमाणे सर्व कागदपत्रे संग्रहीत करून तलाठी कार्यालयात जाऊन नाव नोंदणी करणे.

'कॉमन सर्विस सेंटर' मध्ये नाव नोंदणी करता येते, मात्र त्यासाठी काही शुल्क आकारले जाते. लाभार्थी स्वतः पी. एम. किसान पोर्टलवर जाऊनही नाव नोंदणी करू शकतो.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.