लेक लाडकी योजना नव्या स्वरूपात-
(Lek Ladki Yojana Maharashtra) 2023-2024
लेक लाडकी योजना:
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन माध्यमातून २०२३ अर्थसंकल्पात नवीन योजना सुरू करण्यात आली आहे.’लेक लाडकी योजना’ ही मुलींच्या सक्षमीकरणासाठी नव्या स्वरूपात “लाडकी लेक मी संतांची मजवरी कृपा बहुतांची” मा. उपमुख्यमंत्री (वित्त) श्री.देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिनांक 9 मार्च 2023 रोजी विधानसभेमध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून आर्थिक वर्षासाठी घोषणा करण्यात आली आहे.लेक लाडकी योजना ज्या लाभार्थी पालकांना मुलगी आहे अशा पालकांना या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेचा लाभ कसा घेता येईल आपण पुढील प्रमाणे पाहूया.
- महाराष्ट्र लेक लाडकी योजना
• लेक लाडकी योजना लाभ घेण्यासाठी पुढील प्रमाणे पात्रता लागेल.
लेक लाडकी योजना या योजनेच्या मागे महाराष्ट्र राज्य शासनाचा असा उद्देश आहे की मुलांच्या बरोबरीने मुलींची संख्या समान व्हावी आणि स्त्री भ्रूण हत्या कमी व्हावी. लेक लाडकी योजना कशाप्रकारे राबवण्यात येईल. यामध्ये नियम अटी शर्ती पात्रता जे काही निकष असतील व अर्ज कशाप्रकारे भरले जातील या संदर्भात सर्व माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित केल्या जातील.लेक लाडकी ही योजना नुकती सुरू करण्यात आली असल्यामुळे अर्जासाठी प्रक्रिया अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. याबद्दल सर्व माहिती लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.